
डॉ. अरुण भिसे, असे या डॉक्टरांचे नाव आहे..
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे ते रुग्णसेवा करतात. डॉ. भिसे यांनी असा दावा केला आहे, की तोंडाची चव जाईल, जेवण कमी होईल, त्या दिवसापासून 40 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल, म्हणजेच देशी दारु किंवा व्होडका, ब्रँडी किंवा विस्की, यापैकी कोणतीही एक 30 मिली दारु आणि 30 मिली पाणी, जेवणाअगोदर पेशंटला पिण्यास द्यायचं. मात्र, गरोदर महिला व लिव्हरचाआजार नसलेला पेशंट असावा.
डॉ. भिसे म्हणतात, की कोरोना विषाणूचं वरचं आवरण ‘लिपीड’चं आहे. हे आवरण अल्कोहोलमध्ये विरघळून हा विषाणू निष्क्रीय होतो. त्यामुळेच आपण हातावर सॅनिटायझर फवारतो. दारु घेतल्यानंतर ती रक्तवाहिन्यांद्वारे 30 सेकंदात सर्व शरिरात पोहोचते. फुप्फुसात दारु पोहोचल्यानंतर दारुचा हवेशी संपर्क झाल्यानंतर, दारु हवेद्वारे बाहेर पडते. या प्रक्रियेदरम्यान ज्याठिकाणी विषाणू असेल, त्याचं आवरण गळून पडल्यामुळे तो निष्क्रीय होतो.
40 ते 50 पेशंट बरे केले
दारु ही आयुर्वेदात ‘आसव’ प्रवर्गात येते. भूक न लागण्यावर दारु रामबाण समजली जाते. कोरोनामुळे मानसिक दबावात असणाऱ्या रुग्णाचा ताण कमी करण्याचं काम दारु करीत असल्याचा दावा डॉ. भिसे यांनी केला आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि दारुचं योग्य प्रमाण घेतल्याने आतापर्यंत 40 ते 50 पेशंट बरे झाले आहेत. त्यापैकी 10 रुग्ण तर गंभीर होते. आतापर्यंत एकाचाही मृत्यू झाला नसल्याचा डॉ. भिसे यांचा दावा आहे.
