महाराष्ट्र

खासदार संभाजीराजेंचा आता शुक्रवारपासून संवाद दौरा, ४ जुलै रोजी बदनापुरात

बेधडक | ( जीवन भुतेकर ) – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू केलेले मूक आंदोलन महिनाभरासाठी स्थगित केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संवाद दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी (२ जुलै) त्याची सुरुवात होत असून पुणे ते बीड असा दौरा त्यांनी जाहीर केला आहे.

या दौऱ्याला २ जुलैला सकाळी ९ वाजता पुण्यातून सुरुवात होणार आहे. पुणे, अहमदनगर, आष्टी, जामखेड, पाटोदा या मार्गाने सायंकाळी सहा वाजता बीड, असा दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यावेळी पुणे, अहमदनगर व बीड या तिन्ही जिल्ह्यांत निवडक ठिकाणी थांबून समाज बांधवांशी संवाद साधण्यात येणार आहे. तशा सूचना ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

मराठा आरक्षण विषयी संभाजीराजे छञपती यांच्या संवाद दौरा दिनांक १ जुलै पुणे येथुन चालु झाला असुन दिनांक ३ जुलै रोजी औरंगाबाद येथुन नागपुर कडे मराठा समाजाचे मत समजुन घेण्याकरीता संभाजीराजे दिनांक ४ जुलै रोजी बदनापुर शहरात येत असुन मराठा क्रांती मोर्चा व विविध मराठा संघटनाच्या वतीनं युवराज संभाजीराजे छञपती यांच्या स्वागता साठी बदनापुर शहरात सकल मराठा समाजाने दिनांक ४ जुलै रोजी सकाळी ०९ वाजता शिवराज कॉर्नर धोपटेश्वर फाटा जालना ओरंगाबाद हायवे समोर हजर रहावे असे आव्हाहन सकल मराठा क्रांती मोर्चा च्या वतीनं करण्यात येत आहे. तसेच छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष पंकज जऱ्हाड पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आव्हाहन केले आहे.

To Top