महाराष्ट्र

भव्य कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन जिल्हापरिषद गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते

परळी : ज्ञानेश्वर बडे | शेमारो मराठी बाणा व नाथ प्रतिष्ठान परळी वैजनाथ आयोजित स्व. पंडीत अण्णा मुंडे यांच्या स्मरणार्थ परळी शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद गटनेते अजय (भाऊ) मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री. बाळासाहेब देशमुख, जेष्ठ नेते श्री. माऊली गडदे, नगरसेवक गोपाळराव आंधळे, प्रा. अतुल दुबे, संयोजक ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, गोविंद महाराज मुंडे, सूर्यकांत मुंडे उपस्थित होते.

परळी पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले !

To Top