
बीड ! जिल्ह्यात शिवसेना ताकत दाखवनार का?
बीड : जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानानिमित्त धाराशिव चे खा. ओमराजे निंबाळकर यांनी अनेक ठिकाणी आयोजित मेळाव्यात जिल्ह्यातील आघाडीची स्थिती जाणून घेतली, शिवसैनिकांच्या व्यथा जाणून घेतल्या, आघाडीचा फार्मुला ठरलेला असताना बीड जिल्ह्यात जर तो पाळला जात नसेल तर आम्ही देखील तो पाळण्यास बंधनकारक नसणार असा इशारा त्यांनी मेळाव्यात दिला आहे.
याबाबत बीडच्या शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली आहे. ही बाब पक्षप्रमुख तथा राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे ही कैफियत मांडणार असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेच्यावतीने संपन्न झालेल्या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत उपस्थित राहून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी जिल्हाप्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
