महाराष्ट्र

सोलपुर शहराचा हद्दवाढ भागाचा सिटी सर्व्हेमध्ये समावेश करण्यास शासनाची मंजूरी.

शहराचा हद्दवाढ भागाचा सिटी सर्व्हेमध्ये समावेश करण्यास शासनाची मंजूरी.

आमदार प्रणिती शिंदे यांनी महसूल मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यास यश

मुंबई : दिनांक 25 मार्च 2022 – सोलापूर महानगरपालिकेची हद्दवाढ झाल्यापासून ह्द्दवाढ क्षेत्रातील 12 गावांच्या सिटी सर्व्हे होवून हा भाग सिटी सर्व्हे परिसरामध्ये समाविष्ट होण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांच्याकडे सदरचा विषय लावून धरला होता. याकरीता सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ भागातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून विशेष पाठपूरावा करीत होते. चालू अधिवेशनामध्ये महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांनी अधिवेशन संपण्याच्या आगोदर याबाबतचा शासन निर्णय जाहिर होईल असे आमदार प्रणिती शिंदे व नगरसेवक बाबा मिस्त्री यांना सांगितले होते याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने आज काढला आहे.

हददवाढ भागातील मौजे दहीटणे, बसवेश्वर नगर (देगाव), शिवाजी नगर, प्रताप नगर, मजरेवाडी, नेहरू नगर, केगाव, कसबे सोलापूर, बाळे, सोरेगांव, कुमठे, देगांव, शेळगी या महसूली गांवांच्या विस्तारीत व गावठाण क्षेत्राची मोजणी होवून सदरचा भाग नगरभुमापन क्षेत्रामध्ये समाविष्ट होत असल्याने येथील नागरीकांना भविष्यात सातबारा उतारा ऐवजी मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) मिळणार आहे. तसेच भुखंडाचा नकाशा व मालकी हक्क नोंदविण्याचे अभिलेख मिळकत पत्रिका, सनद व नकाशे तयार होवून मिळणार आहेत. यामुळे नागरीकांना अचूक असे त्यांच्या मालमत्ते विवरण प्राप्त होणार आहे. सन 1992 साली सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये शहरालगतच्या 12 गावे समाविष्ट करून शहराची हद्दवाढ मा. सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी पुढाकार घेवून केलेली होती. यामुळे सोलापूरच्या शहरीकरणास वाव मिळाला. आज आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपूराव्यातून या भागाचे सिटी सर्व्हेक्षण होवून हा भाग सिटी सर्व्हे परिसरामध्ये समाविष्ठ होत आहे या प्रसंगी बोलत असताना वडीलांनी पाहिलेल्या सोलापूर शहराबद्दलच्या स्वप्नास आमदार प्रणितीताई शिंदे या पूर्णत्वाकडे नेत असल्याबाबतचे मत नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी व्यक्त केले.

To Top