महाराष्ट्र

राज्यात सीएनजी स्वस्त होणारसर्वसामान्य नागरिकांना गुढीपाडव्याची भेट

राज्यात सीएनजी स्वस्त होणारसर्वसामान्य नागरिकांना गुढीपाडव्याची भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणेनुसार सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना वित्त विभागाकडून जारी करण्यात आली. त्यामुळे राज्यात सीएनजीचे दर कमी होणार असून नवे दर १ एप्रिलपासून लागू होतील. सीएनजी दर कमी करून अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सर्वसामान्य नागरिकांना गुढीपाडव्याची भेट दिली आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या झळा लागत आहेत.सीएनजी दर कमी झाल्याने वाढत्या महागाईमधून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. सीएनजी इंधन स्वस्त झाल्याने याचा फायदा रिक्षा, टॅक्सीचालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच सामान्य नागरिकांना होणार आहे. सीएनजी स्वस्त झाल्याने प्रदूषण नियंत्रणासही मदत होणार आहे.

 

To Top