महाराष्ट्र

श्वेता जी कैसा हैं चिखली क्या चल रहा हैं? आ.श्वेता महाले यांचे केंद्रियगृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कौतुक 

श्वेता जी कैसा हैं चिखली क्या चल रहा हैं? आ.श्वेता महाले यांचे केंद्रियगृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कौतुक

मर्मबंधातली ठेव ही..!

दिल्ली : दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या दोन टोलेजंग नेत्यांच्या भेटी झाल्या. भेटी काय माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्ती साठी ग्रेट भेटच ठरली!
राजकारणात कोणतीही पार्श्वभूमी नसताना पाठबळ नसताना शून्यातूनही विश्व निर्माण करता येते हा आत्मविश्वास व प्रेरणा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे हनुमान मानल्या जाणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोन टोलेजंग नेत्यांची भेट मला समृद्ध करणारी ठरली.काही वर्षांपूर्वी सामान्य कार्यकर्ते म्हणून काम करणारे मोदी शाह आज देशाचे सत्ताधीश आहेत. विलक्षण प्रेरक आहे हा प्रवास.

ज्यांच्या कुशल चाणक्यनीतीमुळे जम्मु काश्मिरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम 370 रद्द झाले, हे ऐतिहासिक कार्य करणाऱ्या आधुनिक चाणक्य गृहमंत्री मा अमितजी शहा यांची झालेली भेट आयुष्यातील क्ष मर्मबंधातली ठेव होऊन गेली. श्वेता जी कैसा हैं चिखली क्या चल रहा हैं? अशी आस्थेने चौकशी करत या भेटीला सुरूवात झाली.महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम कायमच केले आहे. सहकार ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी आहे. देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या अमितभाई कडून खूप अपेक्षा आहेत.

सहकारात महिलांना खूप कमी संधी आतापर्यंत उपलब्ध झाली . वस्तुतः महिलांना कुटुंब संस्था चालविण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे महिलांना सहकारात अधिकाधिक वाव दिल्यास सहकार क्षेत्र अधिक मजबूत होईल असा आशावाद व्यक्त करून महिलांना सहकारात जास्तीत जास्त संधी देण्याची मागणी यावेळी केली. त्यावर अमितभाईंनी सकारात्मक प्रतिसाद दिला

आपल्या चिखली तालुक्यातील ” उंद्री ” गावाचे ” उदयनगर ” असे नामकरण करण्याचा मी दिलेला प्रस्ताव राज्य शासनाकडून सादर करण्यात आलेला आहे. त्या प्रस्तावास मान्यता देण्याची मागणी केली

तसेच डोंगर शेवली येथील स्वातंत्र्य सैनिक स्व पांडुरंग पाटील यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या धर्मपत्नीस स्वातंत्र्य सैनिकांचे पेंशन तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

या सगळ्यांबाबत अमितभाईंचा प्रतिसाद सकारात्मक होता. एखादा माणूस इतका यशस्वी का होतो? याचे उत्तर आपल्याला अमितभाई कडे पाहून मिळेल. नियोजन, बांधिलकी, सतत काम करण्याची तयारी आणि मायक्रो मॅनेजमेंट या गुणांच्या जोरावर अमितभाई आधुनिक चाणक्य बनले आहेत. माझे भावविश्व समृद्ध करणारी ही मर्मबंधातली ठेव कायम मनाच्या कोपऱ्यात जतन राहील.

 

To Top