
मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर वसंत मोरेंना थेट उद्धव ठाकरेंकडून ऑफर
पुणे – राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांसदर्भात घेतलेल्या भूमिकेला ठामपणे विरोध दर्शविणारे मनसेचे नेते वसंत मोरे यांना मोठा धक्का देत राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली. आता त्यांच्याजागी साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर मनसेच्या शहराध्यक्षपदावरुन वसंत मोरे हकालपट्टी झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ सुरू झाली आहे.
कारण वसंत मोरे यांना थेट शिवसेनेकडून ऑफर आल्याची राजकीय चर्चा आहे. गेल्या दोन – तीन दिवसांपासून वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा होती. त्यानंतर आता वसंत मोरे हे पक्ष बदलणार की मनसेतच राहणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीकडून खुली ऑफर आल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच वसंत मोरे यांची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.
