महाराष्ट्र

ए ताई… पवारांना दगडाने मारण्याचा तुला नक्कीच अधिकार आहे कारण ?

ए ताई…पवारांना दगडाने मारण्याचा तुला नक्कीच अधिकार आहे कारण महिलांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय त्यासाठीच घेतला होता..

सोशल माध्यमात खलील लेख व्हायरल होत आहे ..

मुंबई : आपल्या समाजात संतती म्हणुन नेहमी ‘ मुलगा व्हावा ‘,अशी इच्छा केली जाते.पण पवार साहेबांनी आपल्याला एकच मुल हवे,असा निर्णय मुलगी झाल्यानंतरही घेतला तेव्हा तो शहाणपणाचा नाही अशी चर्चा समाजात सर्वदुर झाली होती.

संकटाच्या काळात अखेर मुलगाच मदतीला येतो,असे मंडळी म्हणत होती आणि तशी त्यांची धारणा पण होती परंतु मी त्या सर्व लोकांना व त्यांच्या विचारांना चोख प्रत्युतर देत असे. हे आणि असे अन्य अनेक विचार आपल्याला मिळालेला एक अनमोल वारसा आहे जे नेहमीच आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत राहिले आहे.

आपले गुण प्रकट करण्याची समान संधी मात्र महिलांना मिळणे जरुरीचे असते.ज्या देशातील महिलांना विकासाच्या प्रक्रियेतस्थान मिळाले आहे तेथील एकंदर राहणीमान उच्च दर्जाचे आहे परंतु जिथे निर्णय प्रक्रियेत महिला नसतात तिथे मात्र अनेक सामाजिक व आर्थिक प्रश्न उभे राहतात असे एकंदरीत अभ्यासातुन लक्षात येते.श्रीलंका,नेपाळ व बांगला देशात हि स्थिती आढळते.कारण एकुण लोकसंख्येत 50 टक्के वाटा असुनही तेथील महिलांना अद्याप समान अधिकार मिळालेले नाहीत.

ह्या सर्व परिस्थितींचा विचार करता आदरणीय शरद पवार साहेब यांनी महिलांच्या संदर्भात काही क्रांतीकारी निर्णयासाठी पुढाकार घेतला

ते निर्णय खालीलप्रमाणे :-

1) केंद्रीय संरक्षणमंत्री असतांना भारतीय सैन्यदलामध्ये महिलांना अधिकारी होण्याची संधी देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला.

2) ‘ महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची ‘ देशामध्ये सर्वप्रथम स्थापना केली.

3) महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व सरकारी नोक-यांमध्ये 33 % आरक्षण देण्याची पहिल्यांदा मागणी करुन पुर्ण केली.

4) महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 % आरक्षण देण्याची पहिल्यांदा मागणी केली आणि ती पुर्ण करण्यासाठी पुढाकार हि घेतला.

5) मुलीला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान वाटा देण्याचा पहिल्यांदा कायदा केला.

पुरोगामी विचारांचा समाजातील प्रत्येक स्तराचा विचार करणारा एकमेव जाणता नेता आदरणीय शरद पवार साहेब.

 

To Top